राफेल पासून वाचण्यासाठी मोदींनी ‘बाईचा’ आधार घेतला : राहुल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य

मोदींचा तीव्र आक्षेप

जयपूर/आग्रा : आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना उद्देशून “राफेल पासून वाचण्यासाठी मोदींनी बाईचा आधार घेतला” असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षांचा निषेध केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांच्या या जयपूर येथील वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्र्यातील सभेमध्ये निषेध केला. ते म्हणाले, “विरोधी पक्षांकडे आता कोणताही मुद्दा शिल्लक नसल्याने त्यांनी महिलांचा अपमान करण्यापर्यंतची पातळी गाठली आहे. राहुल गांधी यांचे हे विधान म्हणजे देशातील सर्व महिलांचा अपमान आहे. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेमध्ये राफेल प्रकरणी विरोधकांनी चालवलेल्या खोट्या आरोपांची पोल खोलल्यानेच कावरे बावरे झालेले राहुल गांधी खालच्या भाषेत टीका करत आहेत.”

तत्पूर्वी आज जयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी, “५६ इंचाची छाती असलेले पंतप्रधान राफेल बाबत बोलण्यासाठी एकदा पण सभागृहात उभा राहिले नाहीत. त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी एका बाईचा आधार घेतला मात्र त्या देखील मोदींना वाचवू शकल्या नाहीत.” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)