मुंबई : बारामतीचा उमेदवार कोण ते आधी जाहीर करा आणि मग बारामती जिंकण्याची भविष्यवाणी करा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांना दिले.
पुणे येथे भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत बारामती सुद्धा जिंकू असे वक्तव्य केले, त्याचा खरपूस समाचार नवाब मलिक यांनी घेतला. 48 पैकी 45 जागा जिंकू आणि त्यामध्ये बारामतीचा समावेश असेल असे सांगत आहेत. नशीब अमित शहा यांनी 48 पैकी 50 जागा जिंकणार असे भाकीत केले नाही, अशी खिल्लीही नवाब मलिक यांनी उडवली.
अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांनी बारामतीचा उमेदवार कोण असणार, नरेंद्र मोदी की अमित शहा की स्वतः मुख्यमंत्री हे आधी जाहीर करा, असे खुले आव्हान भाजपला दिले.
Ads