स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या लिफ्टमध्ये अडकले मोदी

अहमदाबाद: जगातील सर्वाधिक उंची असणाऱ्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले असून देशभरामधून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या गगनचुंबी पुतळ्याला भेट देण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. परंतु आज बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आले असता त्यांना भलत्याच घटनेस सामोरे जावे लागले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बिहारचे उपमुख्यमंत्री हे आज स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी आले असता त्यांनी पुतळ्यामधील लिफ्टचा वापर करत व्ह्यूइंग गॅलरी कडे जाण्याचा प्रयत्न केला मात्र सदर लिफ्ट मध्येच बंद पडल्याने ते काही वेळासाठी लिफ्टमध्ये अडकून पडले. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल देखील होते.

याबाबत स्टॅच्यू ऑफ युनिटीशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांनी क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहिल्यामुळे लिफ्ट बंद पडली परंतु ही समस्या एका मिनिटाच्या आत सोडवण्यात आल्याचा निर्वाळा केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)