मोदी जेथे जातात तेथे खोटेच बोलतात : राहुल गांधी

मोदींना विश्‍वासार्हता उरलेली नाही

चंद्राबाबु नायडू यांच्या उपोषणाला दिला पाठिंबा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आंधप्रदेशची फसवणूक केल्याच्या आरोपावरून दिल्लीत उपोषणासाठी बसलेले आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या उपोषणाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेथे जाऊन पाठिंबा दिला. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की मोदींनी आंध्रपदेशातील सभेत राज्याच्या विशेष राज्याच्या दर्जाच्या मागणी विषयी तेथील जनतेला खोटी माहिती दिली. ते ईशान्येकडील राज्यात जातात तेथेही ते काही तरी खोटे बोलतात. महाराष्ट्र किंवा अन्य कोणत्याही राज्यात ते जातात तेथेही ते खोटेच बोलत असतात. त्यांच्या या सततच्या खोटेबोलण्यामुळेच मोदींची आता विश्‍वासार्हता राहिलेली नाही असे ते म्हणाले.

मोदींनी आंधप्रदेशच्या जनतेचा पैसा चोरून तो अनिल अंबानी यांना दिला असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की आता केवळ दोन महिन्याच्या अवधीत देशातील जनता मोदींना त्यांच्या मनात त्यांच्या सरकारविषयी नेमक्‍या काय भावना आहेत याची जाणिव करून देईल असेही ते म्हणाले. याही वेळी राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणाचा उल्लेख करून सांगितले की त्यांची बनवाबनवी रोज उघडी पडत असून आजही हिंदु नावाच्या वृत्तपत्रात राफेल कराराच्या आधी त्या करारातील लाचलुचपत किंवा भ्रष्टाचाराच्या संबंधातील मुद्दा काढून टाकण्यात आल्याची बातमी प्रसारीत झाली आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी राफेल प्रकरणात चोरी केली आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे असे ते म्हणाले.

नायडु यांनी मोदींच्या विरोधात जे उपोषण सुरू केले आहे त्याला अन्य राजकीय पक्षांचाही मोठा पाठिंबा मिळाला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजीद मेमन, तृणमुल कॉग्रेसचे डेरेक ओबेरियन, समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलामयसिंह यादव या नेत्यांनी नायडू यांना भेटून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)