माध्यमांच्या विनंतीनंतर मोदींकडून ‘ध्यानस्थ’ फोटो घेण्यास परवानगी; मात्र…

केदारनाथ – लोकसभा निवडणुकांचा सातव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार कालच सायंकाळी थंडावला असून प्रचाराच्या धामधुमीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज केदारनाथ येथे पूजाअर्चेसाठी आले आहेत. आज सकाळी 9 ते 9:30च्या सुमारास मोदी केदारनाथ येथे हेलिकॉप्टरद्वारे पोहचले असून आज तेथील एका गुहेमध्ये ते ध्यानधारणा करणार आहेत.

दरम्यान, सध्या मोदी केदारनाथ मंदिरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या गुहेपर्यंत पायी प्रवास करत पोहोचले असून ते आज या गुहेमध्ये ध्यानधारणा करणार आहेत. पंतप्रधान थोड्याच वेळात ध्यानासाठी बसणार असून ते उद्या सकाळपर्यंत याच गुहेत वास्तव्यास असणार आहेत. मोदी ध्यानस्थ अवस्थेत असताना कोणत्याही व्यक्तीस त्यांच्या जवळ जाऊ दिले जाणार नसून या वेळेमध्ये माध्यमांनादेखील त्यांची छायाचित्र घेण्यापासून मज्जाव करण्यात येणार आहे.

दरम्यान, ध्यानस्थ अवस्थेत जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींना माध्यम प्रतिनिधींनी विनंती केल्यामुळे मोदींनी माध्यमांना काही छायाचित्र घेण्यास परवानगी दिली होती.

https://twitter.com/ANI/status/1129698344207433728

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)