मोदींनी राजीनामा द्यावा : मार्क्‍सवाद्यांची मागणी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रमुखपदी वर्मा यांची नियुक्ती कायम ठेवणे हा सरळसरळ पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कार्यालयावरच ठेवण्यात आलेला ठपका असून या निकालाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान मोदींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

मोदींनी ज्या प्रकारे देशातील राष्ट्रीय महत्वाच्या संस्थांची वाट लावली आहे तसा प्रकार आजवर कोणत्याच सरकारने केलेला नाही. आपल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीला येतील म्हणून घाबरून मोदी सरकार हे प्रकार करते आहे अशी टीका मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली आहे. वर्मा यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय न्यायालयाने बेकायदेशी ठरवला आहे त्याची मोदी जबाबदारी घेणार आहेत की नाही असा सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.

पंतप्रधानांमध्ये आता थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता आपल्या पदावरून दूर व्हावे अशी सुचनाही येचुरी यांनी केली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयाने मोदी सरकार आणि त्यांचे बाहुले असलेला केंद्रीय दक्षता आयोग या दोघांनाही चपराक दिली आहे असे त्या पक्षाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)