कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थिती
सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी पुण्यतिथी कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी संवाद साधला असता पत्रकार परिषदेत ते बोलत होते कि, ‘देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबीयांबाबत मोदींनी बोलू नये, तसेच हयात नसताना राजीव गांधींवर टीका होणं चांगलं नाही असे मत त्यांनी व्यक्त केलं. साताऱ्यातील पत्रकार परिषदेत नारायण राणे यांचं आत्मचरित्रवरून झालेल्या वादंगावर ते म्हटले, यांचं आत्मचरित्र मी वाचलेलं नाही, वाचल्यावर बोलेन, त्यांनी काय लिहिलं आहे.
दरम्यान, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची गुरूवारी 60 वी पुण्यतिथी आहे. यावेळी संस्थेचे सदस्य रामराजे ना.निंबाळकर, प्रा. डॉ. एन.डी.पाटील, आ.दिलीप वळसे-पाटील, आ.अजित पवार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खा.सुप्रिया सुळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, विश्वजीत कदम आदी उपस्थित राहणार होते.