सीबीआय मधील बंडाविषयी मोदींनी सत्यकथन करावे 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी 
नवी दिल्ली – सीबीआय प्रमुख आणि उप्रमुखांनीच एकमेकांच्या विरोधात बंड करताना एकमेकांवर जे जाहीर लाचखोरीचे आरोप केले आहेत त्यातून देश हादरला असून या प्रकरणात नेमके तथ्य काय आहे ते आता खुद्द पंतप्रधानांनीच कथन करावे अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सेक्रेटरी डी राजा यांनी केली आहे.

या विषयाचा संबंध आता थेट राफेल गैरव्यवहाराशी जोडला गेला आहे त्यामुळे पंतप्रधानांना आता गप्प राहता येणार नाही. सीबीआयमध्ये सध्या जे सुरू आहे ती थेट बंडाची स्थिती आहे. त्यातून या संस्थेची विश्‍वासार्हता पुर्ण रसातळाला गेली आहे आणि हे थेट पंतप्रधानांच्या नजरेसमोर घडते आहे. सरकारचे प्रमुख या नात्याने मोदींनी आता देशवासियांना या प्रकरारातील सारे तथ्य सांगितले पाहिजे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)