मोदींनी पंतप्रधान झाल्याबद्दल घटनेला श्रेय द्यायला हवे होते – शिंदे 

पणजी: एका चहावाल्याला देशाच्या पंतप्रधानपदावर बसण्याची संधी मिळाली हे घटनेमुळेच होऊ शकले आहे, पण त्याबद्दल पंतप्रधान मोदी हे भारतीय घटनेला कधीच श्रेय देताना दिसले नाहीत अशी टीका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केली आहे. ते म्हणाले की मी सुद्धा स्वत: कोर्टात शिपाई म्हणून काम करीत होतो पण मी त्याचे कधीच राजकीय भांडवल केले नाही.

कॉंग्रेस नेते यतिश नाईक यांनी लिहीलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले की एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला अशी विधाने त्यांच्या तोंडून आपण अनेक वेळा ऐकली आहेत. त्याचे श्रेय देशातील लोकशाही पद्धतीला आणि घटनेला द्यावे लागेल. त्यामुळेच हे शक्‍य होऊ शकले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माझ्या सारखा सोलापुरच्या कोर्टात पट्टेवाला म्हणून काम करणारा माणूसही लोकशाही पद्धतीमुळेच उच्चपदावर पोहचू शकला ते भारतीय घटनेमुळेच शक्‍य झाले आहे. पण स्वत:चेच सतत टुमणे वाजवत राहणे हे लोकशाहीत आपल्यावरच कधीकधी उलटू शकते असे प्रतिपादनही शिंदे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)