नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगामधील मतभेद चव्हाट्यावर आला आहे. निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे. तर सुनील अरोरा यांनी वादावर खुलासा करत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील अरोरा यांनी म्हंटले कि, निवडणूक आयोगाच्या तीनही सदस्य एकमेकांची कॉपी असू शकत नाही. अनेक वेळा विचारांमध्ये मतभिन्नता असते. हे होऊ शकते आणि असायलाही पाहिजे. प्रत्येकाचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात. अंतर्गत वाद आहेत. परंतु, ते अव्यवहार्य आहेत. मी कोणत्याही वादापासून लांब राहत नसून प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, असे त्यांनी सांगितले आहे. याप्रकरणी सुनील अरोरा यांनी लवासा याना एक पत्र दिले आहे.
Chief Election Commissioner Sunil Arora issues statement on EC Ashok Lavasa's purported letter to him, says, 'an unsavory and avoidable controversy reported in sections of media today about internal functioning of ECI in respect of handling of Model Code of Conduct.' (3/3) pic.twitter.com/yuRxOHMaGL
— ANI (@ANI) May 18, 2019
दरम्यान, मोदी-शहांना क्लीन चिट देण्यावरून नाराज अशोक लवासा यांनी आयोगांच्या बैठकीस हजेरी लावणे बंद केले आहे. अशोक लवासा यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहीत आपली नाराजी दर्शवली आहे. यामध्ये मी निवडणूक आयोगाच्या बैठकीत सहभागी होऊ नये, यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.