मोदी-शहा अडवाणींच्या भेटीला 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या दमदार विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा भाजप वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा आशीर्वाद घेतला.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले कि, भाजपचा शानदार विजयाचे कारण अडवाणी सारख्या महान व्यक्तींनी दशकांपासून पक्षाला उभे केले आहे. आणि लोकांना एक नवीन पर्याय दिला. मुरली मनोहर जोशी यांची स्तुती करताना मोदी म्हणाले, डॉ. मुरली मनोहर जोशी हुशार आणि बुद्धिमान आहेत. भारतीय शिक्षण व्यवस्थेत त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी भाजप आणि कार्यकर्त्यांना मजबूत बनविण्याचे काम केले आहे. या कार्यकर्त्यांमध्ये मीही सामील आहे, असे त्यांनी सांगितले.

https://twitter.com/ani_digital/status/1131798670528077824

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)