मोदी, राव आणि ओवैसी एकाच माळेचे मणी : राहुल गांधी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि असदुद्दीन ओवैसी हे एकाच माळेच मणी आहेत. ते लोकांना मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत तुम्ही मुर्ख बनू नका असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तेलंगणातील जनतेला केले आहे.

या संबंधात ट्विटरवर केलेल्या टिपण्णीत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा टीआरएस हा पक्ष म्हणजे भाजपची बी टीम आहे. आणि ओवैसी यांचा पक्ष हा भाजपचीच सी टीम आहे. ओवैसी यांचा पक्ष फक्त भाजप विरोधातील मते कॉंग्रेसपासून फोडण्याचेच काम करीत असतो. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला लोकांनी भुलू नये आणि मुर्ख बनू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

चंद्रशेखर राव हे मोदींचे तेलंगणातील रबर स्टॅम्प म्हणून काम करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. हे तिन्ही नेते वेगवेगळ्या भाषेत बोलतात पण त्यांचा हेतु हा एकमेकांना साथ देण्याचाच असतो असेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)