मोदींनी राफेल मधील चोरीची दिली कबुली

सर्वोच्च न्यायालयातील तपशीलाबाबत राहुल गांधींचा दावा

नवी दिल्ली  – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात राफेल विषयीचा जो तपशील जाहीर केला आहे त्यात चोरीची प्रत्यक्ष कबुलीच दिली आहे असा दावा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. भारतीय हवाईदलाला न विचारताच सरकारने राफेल खरेदी करारात बदल केला असा आरोपही त्यांनी केला आहे.

-Ads-

राफेल खरेदी प्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या चौदा पानी तपशीलात मोदी सरकारने चोरीची थेट कबुलीच दिली आहे असे राहुल गांधींचे म्हणणे आहे. त्यांनी म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयात त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात सरकारने या करारात हवाईदलाला विचारणा न करताच बदल केले गेले असल्याची कबुली दिली आहे. आणि त्याद्वारे त्यांनी 30 हजार कोटी रूपये अंबानींच्या खिशात घातले आहेत.

आपल्या ट्‌विटर अकौंटवर त्यांनी हा दावा केला आहे. पिक्‍चर अभी बाकी है दोस्त अशी हिंदी टिपण्णीही राहुल गांधी यांनी यात केली आहे. सरकारने सादर केलेल्या तपशीला विषयी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणेही त्यांनी या ट्‌विटर मध्ये जोडली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की राफेल व्यहरातील गैरव्यवहारच सरकारच्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाला आहे.

36 राफेल विमाने संरक्षण मंत्रालयाच्या सन 2013 सालच्या पद्धतीला अनुसरूनच घेतली असून त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीचीही मान्यता घेण्यात आली आहे असे केंद्र सरकारने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तथापी सरकारने या विमानांच्या किंमतीचा तपशील मात्र गुप्त ठेवला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)