मोदींनी पुन्हा एकदा पंतप्रधान बनणे देशासाठी गरजेचे – राज्यपाल 

नवी दिल्ली – राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले. मोदींचे पुन्हा निवडून येणे देशासाठी आणि समाजासाठी गरजेचे आहे, असे कल्याण सिंह यांनी म्हंटले आहे. कल्याण सिंह यांच्या वक्तव्याने विरोधकांच्या हातात आयते कोलीत मिळाले आहे.

कल्याण सिंह म्हणाले कि, आम्ही सर्व जण भारतीय जनता पक्षाचे कार्येकर्ते आहोत. म्हणूनच नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनविण्याचा आमचा उद्देश आहे. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनावे हे देशासाठी आणि समाजासाठी गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींला कोणत्याही पक्षाच्या प्रचार करण्याची परवानगी नसते. यामुळे कल्याण सिंह यांचे वक्तव्य नवा वाद उभा करू शकतो. तसेच या मुद्द्यावरून विरोधकही सत्ताधाऱ्यांना घेरण्याची संधी सोडणार नाही.

https://twitter.com/ANI/status/1110060897639321601

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)