ईस बार मोदी बेरोजगार ! : मार्क्‍सवाद्यांची निवडणूक घोषणा

नवी दिल्ली – ईस बार मोदी बेरोजगार, ही घोषणा देत मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला प्रचार करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाने ही घोषणा दिली आहे. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षाने मोदींच्या विरोधातील प्रचारात ही मुख्य घोषणा करण्याचे ठरवले आहे.

या संबंधात माहिती देताना पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्या वृंदा कारत यांनी म्हटले आहे की आम्ही तीन प्रमुख मुद्‌द्‌यांवरून ही निवडणूक लढवणार आहोत. यातील पहिला मुद्दा देश वाचवण्यासाठी मोदींनी सत्तेवरून घालवणे हे आमचे पहिले उद्दीष्ठ आहे. त्यानंतर मोदींनी राबवलेली सारी धोरणे बदलणे हा आमचा दुसरा मुख्य मुद्दा असून केंद्रात सेक्‍युलर सरकार स्थापन करणे हे आमचे तिसरे मुख्य उद्दीष्ठ आहे.

भाजपने सोशल मिडीयावर मै भी चौकीदार ही मोहींम राबवायला सुरूवात केली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही ईस बार मोदी बेरोजगार ही मोहीम चालवणार आहोत. ज्या मतदार संघात आम्ही निवडणूक लढवत नाही त्या मतदार संघात गैर भाजप उमेदवाराला मदत करून आम्ही निवडून आणू असे त्या म्हणाल्या. पश्‍चिम बंगाल मध्ये आम्ही कॉंग्रेसच्याबरोबर तृणमुल कॉंग्रेस आणि भाजपच्या विरोधात निवडणूक लढवणार आहोत असे त्या म्हणाल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)