लोकपाल विधेयक लागू झाल्यास तर मोदी हेच पहिले आरोपी :  वीरप्पा मोईली

राफेल विमान घोटाळा प्रकरणात आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेचे वीरप्पा मोईली यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतूद ही चीनच्या एकूण संरक्षणाच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. आता त्यातील 20 टक्के रक्कम ही  राफेल विमानांसाठी जाईल. त्यातून सरकारचा कमकुवतपणा उघड झाला,असे त्यांनी म्हटले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, राफेल प्रकरणातील आणखी एक तथ्य नामंकित राष्ट्रीय दैनिकात उजेडात आल्या नंतर राफेल विमान करारावरून भाजपा आणि काँग्रेसमध्ये दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत दिसून येत आहे. यातच  2019-20 साठीच्या अर्थसंकल्पावर सोमवारी संसदेमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली म्हणाले की, ”केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रासाठी केलेली आर्थिक तरतूद ही चीनच्या एकूण संरक्षणाच्या तरतुदीचा केवळ पाचवा भाग आहे. आता त्यातील 20 टक्के रक्कम ही  राफेल विमानांसाठी जाईल. त्यातून सरकारचा कमकुवतपणा उघड झाला आहे. मला वाटते  म्हणूनच सरकार लोकपाल विधेयक लागू करत नाही आहे. जर लोकपाल विधेयक लागू झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पहिले आरोपी ठरू शकतात. त्यामुळेच ते सध्या घाबरले आहेत. तसेच या प्रकरणाची जेपीसी चौकशीही करण्यात आलेली  नाही.”

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)