‘चौकीदार चोर है’ ला मोदींनी दिले उत्तर

‘चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. त्यानंतर या मोहिमेला ट्विटरवर भाजप नेत्यांनी आपल्या नावात बदल करून प्रतिसाद दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौकीदार हा ट्रेण्ड सुरू केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी तो फाॅलो केला आहे. यादरम्यान मोहिमेच्या अंतर्गतच बुधवारी पंतप्रधान मोदींनी देशभरातील लाखो चौकीदारांशी संवाद साधला आहे. तसेच राहुल गांधींच्या आरोपालाही नरेंद्र मोदींनी उत्तर देत निशाणा साधला आहे की, ‘चौकीदार चोर है’ ही मोहीम सुरक्षारक्षकांचा अपमान करण्यासाठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)