विरोधकांना मोदी फोबीया झालाय – अमित शहा

नरसिंगपुर (मध्यप्रदेश) – सध्या विरोधकांना मोदी फोबीया झाला आहे त्यामुळे ते प्रत्येक बाबतीतच मोदींना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करीत आहेत असे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. आज येथील एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. नेहरू गांधी घराण्याच्या चार पिढ्यांनी देशासाठी काय केले याचा आधी हिशोब द्यावा त्यानंतरच त्यांनी मोदी सरकारकडे त्यांच्या कारभाराचा हिशोब मागावा असेही त्यांनी म्हटले आहे. विरोधकांना देश मोदी मुक्त करायचा आहे पण आम्हाला मात्र देश गरीबी, असुरक्षितता, आणि हवाप्रदुषणापासून मुक्त करायचा आहे असे ते म्हणाले. यासाठी मोदी सरकार कसोशिचे प्रयत्न करीत आहे असे ते म्हणाले.

मोदी सरकारने गेल्या चार वर्षात देशात एकूण 129 कल्याणकारी योजना राबवल्या. तुम्ही देशासाठी गेल्या चार पिढ्या काय केले असा सवाल त्यांनी कॉंग्रेसला उद्देशून केला. अलिकडेच एका सभेत राहुल गांधी यांनी आपल्या 22 मिनीटांच्या भाषणात मोदींचे 44 वेळा नाव घेतले. मला आश्‍चर्य वाटते की ते कॉंग्रेसचा प्रचार करीत आहेत की भाजपचा असा टोमणाही त्यांनी मारला.

उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करून जी कर्तबगारी बजावली आहे त्याला तोड नाही असे ते म्हणाले. मनमोहनसिंग सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था 9 व्या स्थानावर होती ती आम्ही सहाव्या स्थानावर नेली आहे असा दावाही अमित शहा यांनी यावेळी केला. पाच राज्यांतील निवडणुकीची प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत भारताने ब्रिटनला मागे टाकून जगात पाचवे स्थान पटकावलेले असेल असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)