सोलन: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीच्या मुद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या कॅबिनेटला नोटबंदीचा निर्णय घेताना रेसकोर्स येथील आपल्या निवासस्थानी कुलूप लावून कोंडले होते’, असा आरोप राहुल गांधींनी हिमाचल प्रदेशातील प्रचारसभेत बोलताना केला.
‘हे खरं आहे, एसपीजी सुरक्षा पुरवणारे माझी देखील सुरक्षा करतात त्यांनीच मला ही खबर सांगितली आहे’.असं सुद्धा राहुल गांधी यावेळी म्हणाले. 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी चलनात असलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला होता.
#WATCH Rahul Gandhi in Solan,Himachal Pradesh: Narendra Modi ne apne cabinet ko notebandi ke samay racecourse road mein taale se bandh kar diya tha.Sachaai hai, SPG wale meri bhi security karte hain,inhone ne bataya mujhe pic.twitter.com/YsQLyvsNTF
— ANI (@ANI) May 17, 2019