मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी योजना?

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये काँग्रेसकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे केंद्रातील मोदी सरकार खडबडून जागे झाले आहे. तिन्ही राज्यांतील भाजपच्या पराभवाचे प्रमुख कारण नाराज असलेला बळीराजाच असल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे. शेतकरी कर्जमाफीचा वायदा केलेल्या काँग्रेसने तिन्ही राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली असल्याने भाजप सरकारवर देखील नाराज झालेल्या शेतकऱ्यांना गळ घालण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांची नाराजी महागात पडू शकते याची प्रचिती आल्याने, नाराज शेतकऱ्यांसाठी काय करता येईल याचाच आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांच्यासोबत तब्ब्ल तीन चर्चा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार मोदी सरकार लोकसभेचे हिवाळी अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)