पाच वर्षांत मोदी सरकारने काहीच केले नाही 

नवी दिल्ली – पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने जनतेला अनेक आश्‍वासने दिली होती. मात्र या पाच वर्षात या सरकारने काहीच केले नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. ते म्हणाले की, सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्‍वासनाची पूर्तता केलेली नाही.

सरकारने सुरुवातीला विकासाचे, रोजगार निर्मितीचे, प्रत्येकाच्या खात्यात कोट्यवधी रक्कम टाकण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यातील कोणतेही आश्‍वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. आता सरकार पुतळ्याचे आणि मंदिरांचे आश्‍वासन देत असल्याचे त्यांनी सांगितले. आता निवडणुका जवळ आल्यानंतर हे सरकार भावनिक मुद्द्यांना स्पर्श करण्याची शक्‍यता आहे. सरकारने आपल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)