भारताच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास मोदी सरकारला अपयश -मनमोहनसिंग

बेरोजगारी, ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि गोंधळाच्या स्थितीने देशातील युवावर्ग भांबावला

नवी दिल्ली: देशातील तथाकथित विकासात अनेकांचे विद्यमान रोजगारच गमावले गेले आहेत. वाढती बेरोजगारी, ग्रामीण भागातील वाढता कर्जबाजारीपणा आणि शहरी भागातील अस्वस्थता यामुळे देशातील युवावर्ग भांबावला आहे. मोदी सरकारला देशाच्या आर्थिक क्षमतेचा विकास करण्यास पुर्ण अपयश आल्याचा आरोप माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दिल्ली स्कुल ऑफ मॅनेजमेंटच्या पदवीप्रदान सोहोळ्यात बोलताना त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचे सध्याचे चित्र यावर भाष्य केले. ते म्हणाले की भारताच्या या खालावलेल्या आर्थिक स्थिती मुळे लोकांच्या समस्यांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली असून त्याचा समाजावर विघातक परिणाम होत आहे असे ते म्हणाले.

देशाची आर्थिक स्थिती खालावत असताना आणि लोकांपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असताना आता देशात विघातक शक्तींनीही तोंड बाहेर काढले आहे असे ते म्हणाले.देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या समस्या आणि शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे आर्थिक स्थितीतील असमानता ठळकपणे समोर आली आहे. या आर्थिक असमानतेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्या सोडवण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती दाखवली पाहिजे असे ते म्हणाले.

देशाच्या औद्योगीक क्षेत्रात रोजगार निर्मीतीची क्षमता असते पण औद्योगिक क्षेत्राची वाढही मंदावली असून युवकांना रोजगाराच्या वाटाच बंद झाल्या आहेत असे ते म्हणाले. नोटबंदीच्या अव्यवहार्य निर्णयामुळे देशातील छोट्या व्यावसायिकांना मोठा झटका बसला आहे.

ते म्हणाले की जग आज वेगाने बदलते आहे. एकीकडे आपण या बदलत्या स्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत पण दुसरीकडे आपल्यापुढे देशांतर्गत मोठी आर्थिक आणि सामाजिक आव्हाने निर्माण झाली आहेत. त्याची सांगड आपण कशी घालणार याविषयी सध्या आपल्याकडे कोणतीही ठोस दिशा दिसत नाही असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)