मोदींना क्लीन चिट, मिशन शक्तीची घोषणा आचारसंहितेचा भंग करीत नाही – निवडणूक आयोग  

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #MissionShakti बाबतची माहिती देण्यासाठी स्वतः देशाच्या जनतेला संबोधित केल्यावरून विरोधकांमध्ये चांगलेच संतापाचे वातावरण पसरल्याचे चित्र आहे. या प्रकरणी विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. यावर निवडणूक आयोगाने आज मोदींना क्लीन चिट दिली आहे.

निवडणूक आयोगाच्या मतानुसार, मिशन शक्तीची घोषणा करताना कोणत्याही आचारसंहितेचा भंग झालेला नाही. मोदींच्या भाषणादरम्यान पक्षाचा प्रचार अथवा मतांसाठी कोणत्याही प्रकारचे आवाहन करण्यात आलेले नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, मिशन शक्तीची घोषणा करताना आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने एका समितीचे गठन करून मोदींचे भाषण तपासले होते. परंतु, यामध्ये कोणतेही वाक्य आक्षेपार्ह आढळले नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)