पश्चिम बंगालला काँग्रेसपेक्षा मोदींकडून जास्त निधी : स्मृती इराणी 

जॉयनगर (पीटीआय) : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वातील भाजप सरकारने काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये पश्चिम बंगालला देण्यात आलेल्या निधीपेक्षा जास्त निधी दिला असल्याचा दावा पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेमध्ये केला.

यावेळी बोलताना इराणी म्हणाल्या की, “आमच्या सरकार आगोदर सत्तेत असलेल्या काँग्रेसने पश्चिम बंगालसाठी १ लाख करोड रुपयांची आर्थिक तरतूद केली होती तर भाजप सरकारने १४व्या अर्थ संकल्पाद्वारे पश्चिम बंगालसाठी २.८० लाख करोड रुपयांचा निधी दिला आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देखील इराणी यांनी जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, “पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जी यांना राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजना का राबवत नाही? असा जबाब विचारायला हवा. या कल्याणकारी योजनेमध्ये गोर-गरिबांच्या आरोग्यासाठी ५ लाखांची तरतूद आहे.”

यावेळी बोलताना त्यांनी तृणमूल आणि काँग्रेस आघाडीच्या शक्यतेवर देखील टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)