आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी मोदी; विरोधकांकडे कोण? : उद्धव ठाकरे

अहमदाबाद : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांचा आगामी लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गुजरात गाठल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील शिवसेना-भाजपमधील संबंध भलतेच ताणले गेले होते. महाराष्ट्रातील शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून एकमेकांवर जहरी टीका केली जात होती मात्र सार्वत्रीक निवडणुकांच्या तोंडावर अमित शहा यांच्या मध्यस्थीने सर्व वाद मिटले आहेत.

सार्वत्रीक निवडणुकांच्या घोषणेपुर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर अफजल खानाची फौज, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून ‘पहारेकरी चोर आहे’ अशा कडवट टीका केल्या होत्या मात्र आज अमित शहांचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उद्धव ठाकरे यांचा काही औरच अंदाज पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांनी यावेळी युतीचे तोंडभरून कौतुक तर केलेच मात्र पंतप्रधानांचे गोडवे गाण्यात देखील ते मागे राहिले नाहीत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी मोदी आहेत विरोधकांकडे कोणता चेहरा आहे काय?’ असं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणाने शिवसेनेने भाजपाविरोधात उपसलेली तलवार म्यान करण्यात आली असल्याचे अधिकृत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)