राफेलबाबत बोलण्याचे धाडस नसल्याने मोदी लोकसभेत न येता, खोलीत लपून बसतात : राहुल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. लोकसभेमध्ये बोलताना आज राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये राफेलबाबत लोकसभेमध्ये येऊन चर्चा करण्याचे धाडस नसल्यामुळे ते आपल्या खोलीमध्ये लपून बसनेच जास्त पसंत करतात.”

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राफेलबाबतची एक ऑडिओ क्लिप लोकसभेमध्ये सादर करण्याची परवानगी मागितल्याने सभागृहामध्ये एकाच गोंधळ उडाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधींच्या या मागणीवर बोलताना केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी जोरदार आक्षेप नोंदविताना, “सदर ध्वनी फित ही नकली असून कोणीतरी राजकीय हेतूने ती बनवली आहे. या ध्वनीफितीच्या सत्यतेबाबत राहुल गांधी प्रमाण देऊ शकतात काय? ही ध्वनीफीत नकली निघाल्यास राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यपद देखील काढून घेतली जाऊ शकते, याचा तरी त्यांना अंदाज आहे काय?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढविला.

सभागृहामध्ये यावरून बराच गदारोळ झाल्यानंतर राहुल गांधी यांनी शेवट, “आपण ही ध्वनी फीत ऐकविण्याआगोदर ती तपासून घेऊ,” असा पवित्र घेतल्याने जेटली यांनी गांधींना पुन्हा लक्ष करीत, “राहुल गांधी हे खोटारडे असून ते सतत असत्य पसरवीत असतात.” अशी टीका केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)