मोदींनी ‘ते’ केलं ‘जे’ मनमोहन सिहांना जमलं नाही : सीतारामन

पश्चिम बंगाल : संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर वक्तव्य करताना एका दगडात दोन पक्षी मारले. यावेळी बोलताना संरक्षण मंत्र्यांनी पुलवामा येथे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदद्वारे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानला खडे बोल सुनावले तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या धडक कारवाईबाबत त्यांची पाठ थोपटताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर निशाणा साधला. “पाकिस्तान जगासमोर आपणच दहशतवादामुळे जेरीस आल्याचा कांगावा करतो मात्र वास्तवात चित्र वेगळंच आहे. जर पाकिस्तान खरंच दहशतवादाने त्रस्त असेल तर ते दहशतवादाविरोधात कारवाई का करीत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही पाकिस्तानला २००८च्या दहशतवादी कारवाईनंतर पुरावे दिले होते परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्वतः जैशने स्वीकारली असून पाकिस्तानला आणखी कोणता पुरावा हवा आहे? पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई न केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कारवाईचे पाऊल उचलले. मात्र भारताचे पूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांना अशी कारवाई करणे जमले न्हवते.”

-Ads-

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)