भारत-चीन सीमेवर मोदींनी साजरी केली सैनीकांसोबत दिवाळी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून केदारनाथ येथे भेट देऊन पूजा अर्चा केली. यानंतर पंतप्रधानांनी हर्सिल येथील भारत-चीन सीमारेषेवर तैनात असणाऱ्या सैनिकांची भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानांच्या या भेटीबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, बर्फच्छादित प्रदेशामध्ये सेवा करणाऱ्या आपल्या शूरवीर जवानांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले तसेच १२५ करोड भारतवासीयांना आपल्या घरी सुरक्षित दिवाळी साजरी करता येण्याचं एकमेव कारण सीमेवर निरंतर देशसेवा करणारे जवान असल्याचे सांगून त्यांनी जीवनांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)