मोदींनी राजकारणासाठीच केला हवाई हल्ला – फारूख अब्दुल्ला 

नवी दिल्ली – मोदी सरकारने पाकिस्तानवर केलेल्या हवाईहल्ल्याच्या प्रकरणात आत्तापर्यंत मोैन पाळणारे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनीही आता या वादात उडी घेतली आहे. मोदी सरकारने केवळ राजकीय लाभ लक्षात घेऊनच ही कारवाई केली असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की मोदी सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे त्यामुळे ते काश्‍मीरात पाकिस्तानच्या विरोधात लुटुपुटुची कारवाई करून आपणच देशाचे तारणहार आहोत असे सामान्य जनतेला भासवण्याचा प्रयत्न करणार हे अपेक्षितच होते. आपल्या शिवाय भारताला तरणोपाय नाही अशी प्रतिमा त्यांना देशवासियांपुढे निर्माण करायची होती त्या प्रयत्नांतूनच त्यांनी हा प्रकार केला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान विरोधातील या हवाई चकमकीत भारताने कोट्यावधी रूपये िंकंमतीचे विमान गमावले आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)