चीन-पाकच्या संयुक्‍त निर्मितीच्या लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण 

बिजींग – चीन आणि पाकिस्तानने संयुक्‍तपणे निर्मिती केलेल्या “जेएफ-17′ या लढाऊ विमानांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या लढाऊ विमानांनी भारतासारख्या समर्थ प्रतिस्पर्ध्यापासून संरक्षण केले जाऊ शकते, असा तज्ञांचा दावा आहे. “जेएफ-17 ब्लॉक 3′ या विमानांची निर्मिती आणि उत्पादनाचे काम सुरू आहे, असे या विमानांचे चीनी तज्ञ आणि खासदार यांग वेई यांनी सांगितले. ही “जेएफ-17′ विमाने 27 फेब्रुवारीला ताबा रेषेजवळ भारतीय हवाई दलाच्या विमानांविरोधात वापरण्यात आली होती. मात्र या हवाई चकमकीदरम्यान अमेरिकेच्या बनावटीचे “एफ-16′ विमान पाडले गेले, असे पाकिस्तानच्या माध्यमांचे म्हणणे आहे.

“जेएफ-17′ या विमानांनाच पूर्वी “एफसी-1 शियाओलोंग’ असे म्हटले जायचे. चीन-पाकच्या संयुक्‍त निर्मितीच्या या विमानांचे इंजिन काही वर्षे रशियाकडून पुरवले जात होते. या विमानाचा वापर चीनपेक्षा पाकिस्तानच्या हवाई दलाकडून अधिक केला जातो. चीनने रशियाच्या सुखोईसारख्या आधुनिक आणि काही देशी बनावटीच्या विमानांचा वापर वाढवला आहे.

“जेएफ-17’ची तुलना भारताच्या तेजस आणि दक्षिण कोरियाच्या “एफए-50′ या विमानांशी केली जाते. इलेक्‍ट्रॉनिक रडार, एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता आणि शत्रूच्या ठिकाणांची माहिती मिळवण्याची यंत्रणा त्यादृष्टीने “जेएफ-17’च्या आधुनिकीकरणावर भर दिला जात आहे, असे यांग यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)