स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : 15 हजारांचा मुद्देमाल जप्त
नगर – राहुरी शहरातील नवीपेठ येथील यशराज मोबाइल शॉपी मधून मोबाइल चोरणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. त्याच्याकडून 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी संतोष आदीनाथ नन्नवरे (वय- 38) यास ताब्यात घेतले आहे. तसेच हा गुन्हा त्याचा साथीदार योगेश निमसे (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी मिळून गुन्हा केला असल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार नन्नवरे हा नगर-औरंगाबाद महामार्गावरील सिक्युएव्ही येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हेशाखेचे विजयकुमार वेठेकर, मन्सुर सय्यद, रविंद्र कर्डिले, अण्णा पवार, दीपक शिंदे, रविकिरण सोनटक्के, सचिन आडबल, बबन बेरड यांनी सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 15 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील तपासाकामी राहुरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.