संगमनेर: पुणे – नाशिक महामार्गावर आंबी खालसा शिवारात मोबाईलचे दुकान फोडून चोरांनी 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.11) सकाळी सहा वाजता उघडकीस आली.
घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गाडेकर यांचे यांची आंबी खालसा शिवारात नाशिक-पुणे महामार्गालगत सद्गुरू मोबाईल शॉपी नावाचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्रीनंतर चोरांनी दुकानाच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले जुने मोबाईल, एलईडी बल्ब, हेडफोन व चार्जर असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला. याप्रकरणी राजेंद्र गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.