दुष्काळग्रस्तांसाठी मनसेचा ‘दंडुका मोर्चा’

मुंबई – राज्यात कमी पाऊस पडल्याने अनेक तालुक्‍यांमध्ये दुष्काळसदृश्‍य परिस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारकडून उपाययोजना आणि अन्य मागण्यांसाठी मनसेच्या वतीने “दंडुका मोर्चा’ काढण्यात येणार आहे. पहिला मोर्चा 27 नोव्हेंबरला औरंगाबाद येथे काढणार आहे.

याबाबत मनसे नेते अनिल शिदोरे यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. शिदोरे म्हणाले, सरकारने या स्थितीवर उपाययोजना केल्या मात्र नेमक्‍या काय उपाययोजना कराव्या लागतात याची माहिती सरकारला आहे की नाही? दुष्काळ नियंत्रण विभाग सुरू करणे अपेक्षित आहे. मात्र तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. दुष्काळी भागात रोजगाराच्या योजना नसल्याने अनेकजण स्थलांतर करत आहेत.सरकारने रोजगारासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या पाहिजे, असे ते म्हणाले.

-Ads-

जनतेसह विरोधी पक्ष आणि मनसेने आवाज उठवल्याने सरकारने दुष्काळ घोषित केला. मात्र हा दुष्काळ केवळ कागदावरच असल्याची टीका मनसेने केली आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे आणि सरकारची काहीही तयारी नाही, असा आरोप देखील शिदोरे यांनी केला.

दुष्काळाच्या स्थितीत जनावरांसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. म्हणूनच सरकारला जाग यावी यासाठी 27 नोव्हेंबरला मनसे औरंगाबादमध्ये दंडुका मोर्चा काढणार आहे. या मोर्चाला राज ठाकरे उपस्थित नसतील, असे शिदोरे म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)