महाराष्ट्र नवनिर्माण सेना यंदा लोकसभा निवडणूक लढणार नाही

मुंबई – लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माघार घेतली आहे. निवडणुकीतून माघार घेत असल्याचे मनसेकडून पत्रक जारी करण्यात आले आहे. यामुळे मनसेची लोकसभा निवडणूकीबाबतची मनसेची भूमिका स्पष्ट झाली आहे. मनसे नेते शिरिष सावंत यांनी एक पत्रक जारी करत ही अधिकृत माहिती दिली आहे.

मात्र, आता मनसे कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे.  19 तारखेला होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे कोणाला पाठिंबा देणार? हे जाहीर करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)