मनसेकडून भाजपवर “पेपर स्ट्राईक’

56 मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवून दाखवण्याचे आवाहन
मुंबई – सध्या गाजत असलेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या “लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने आज “आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले. या उत्तरानंतर आता मनसेकडून भाजपला एक 56 मार्कांची प्रश्नपत्रिका देत “पेपर स्ट्राईक’ केला आहे. या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.

या प्रश्नपत्रिका मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे यांनी सोशल मीडियावर जारी केल्या आहेत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 2 दिवसांचा वेळ आहे, असेही सांगण्यात आले आहे. यामध्ये “पाकिस्तानच्या कुठल्या नेत्याला मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटते? , शेतकऱ्यांना साले कोण म्हणाले?, 15 लाखांचा जुमला कुणी दिला?, जवानांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त वक्तव्य कुणी केले? मुलींना पळवून आणून देतो, असे कोणता नेता म्हणाला? यासह भाजपला कोंडीत पकडणारे अनेक प्रश्न केले आहेत.


राज ठाकरेंच्या आरोपांवर भाजपचा खुलासा
मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या “लाव रे तो व्हिडीओ’ला भाजपने आज “आता बघाच तो व्हिडीओ’ म्हणत उत्तर दिले. राज ठाकरेंच्या पोलखोल सत्राला उत्तर देण्यासाठी भाजपने या सभेचे आयोजन केले होते. रंगशारदा सभागृहात दोन स्क्रीन लावून राज मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या आरोपांवर खुलासा केला. आशिष शेलार म्हणाले की, राज ठाकरेंनी 32 खोट्या प्रकरणात आरोप केले. हे आरोप आरटीआयच्या माध्यमातून केले का? जे फुटेज घेतले ते भाजपच्या व्हेरिफाईड अकाउंटवरून घेतल्या का? ज्या बातम्या दाखवल्या त्या पूर्ण दाखवल्या का?, अनव्हेरिफाईड सोरर्सेस वापरून खोटे आरोप राज ठाकरेंनी केले आहेत, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)