राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात मनसेचे झेंडे 

पिंपरी चिंचवड – मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पार्थ पवार यांच्या प्रचार सभेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला पक्ष लोकसभा निवडणुका लढवणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले होते. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निडणुकीत साथ देणार असल्याचीही चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. परंतु राज ठाकरे अथवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही अधिकृत घोषणा जाहीर झाली नाही. त्यामुळे मावळ मधील पार्थ पवार यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबत मनसेचाही झेंडा दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळासोबत मनसेचे इंजिन देखील एकत्र दिसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)