मनसेच्या माजी नगरसेविकेसह पंधराजणांवर गुन्हा

गोळीबारानंतर शुक्रवार पेठेत दहशतीचे वातावरण

पुणे – शुक्रवार पेठेत दोन गटात वादावादीतून झालेल्या गोळीबारानंतर दहशत निर्माण केल्याप्रकरणी मनसेच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील यांच्यासह 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनीषा धुमाळ (वय 35, रा. धुमाळ निवास, शुक्रवार पेठ) यांनी यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दंगल आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याने, रूपाली पाटील, प्रियांका पाटील, त्यांचा वाहनचालक, अनुजा पाटील यांच्यासह 15 जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली पाटील यांचा भाऊ रुपेश पाटील याचा मंगेश धुमाळ, मंदार धुमाळ यांच्याबरोबर वाद झाला होता. या कारणावरून पाटील आणि धुमाळ यांच्या साथीदारांमध्ये बुधवारी (दि. 31) दुपारी मंडईजवळील शिंदे आळीत हाणामारी झाली. पाटील आणि साथीदारांकडून पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला तसेच मंगेश धुमाळ याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. धुमाळ याच्या साथीदारांनी पाटील, विशाल गुंड यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले.

भरदिवसा गोळीबार झाल्याने शहराच्या मध्यभागात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रूपाली पाटील, प्रियांका पाटील, अनुजा पाटील आणि साथीदार मनीषा धुमाळ यांच्या घरात शिरले. मनीषा यांचा पुतण्या मंगेश आणि मंदारने केलेल्या मारहाणीचा जाब विचारून त्यांनी शिवीगाळ केली. धुमाळ यांच्या दरवाजावर लाथा मारण्यात आल्या. दहशत निर्माण करण्यासाठी तीक्ष्ण शस्त्रांचा धाक दाखविण्यात आला, असे मनीषा धुमाळ यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक व्ही. डी. केसरकर तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)