मनसे महाआघाडीत नाहीच; लवकरच राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. महाआघाडीत सामील झाल्यास मनसेला राष्ट्रवादीकडून कल्याण, ईशान्य मुंबईतून जागा मिळे ल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र याठिकाणी राष्ट्रवादीकडून उमेदवार घोषित केल्याने महाआघाडीत मनसे सामील होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीकडून आज कल्याण, ईशान्य मुंबईतील उमेदवार घोषित करण्यात आले असून कल्याणमधून बाबाजी पाटील आणि ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माम आगामी लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढणार की राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

-Ads-

दरम्यान, राज ठाकरे 20 मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणूकीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)