दाऊदच्या नावावर बसपा पक्षाच्या आमदारास धमकी

1 कोटी रूपये द्या नाहीतर तुझ्यासाठी एक गोळी खूप आहे

लखनऊ – बहुजन समाज पक्षाचे (बसपा) आमदार उमाशंकर सिंग यांना एका अज्ञात व्यक्तीकडून दाऊदच्या नावाखाली धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून  एक कोटी रूपये खंडणीची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहीम यांच्याकडून जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उमाशंकर सिंग हे बलिया येथील रसडा भागातून आमदार आहेत. त्यांनी सांगितले की, सहा आॅगस्टला त्यांना मोबाईलवर तुमचा ई-मेल पहा असा संदेश आला. तेव्हा त्यांनी ही बाब गांभिर्याने घेतली ऩाही. कारण त्यांना अनेक तरूण बायोडाटा पाठवत असतात. असा एखादा मेल असेल असे त्यांनी समजले.

पण दोन दिवसाने म्हणजे आठ आॅगस्टला त्यांना परत त्याच नंबरहून आणखी एक संदेश मिळाला. त्यामध्ये लिहले होते की, ही शेवटची चेतावनी, जगायच की मरायच, एक कोटी रूपये. ईमेल पाहिल्यानंतर त्यांना दाऊदचा फोटो दिसला. ई-मेल मध्ये लिहले होते, तुम्ही बलियाच्या लोकांची सेवा करत आहात. जर तुम्हाला हे काम करत रहायचे असेल तर एक कोटी रूपये द्या नाहीतर तुमच्यासाठी एक गोळीच खूप आहे. आम्ही तुम्हाला कोणत्याही वेळी मारू शकतो.

त्यानंतर आमदार  उमाशंकर सिंग यांनी लखनऊ येथील गोमतीनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात केस दाखल केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)