रत्नागिरी – उपउभियंत्यावर चिखलफेक करणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला.
दरम्यान, नितेश यांना 4 जुलै रोजी पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांची रवानगी 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली होती. ही मुदत संपल्यामुळे नितेश यांना आज पुन्हा दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची (23 जुलैपर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.