आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात “स्टंट’ आंदोलन

पुणे – मराठा समाज आरक्षण आंदोलनाबाबत आमदार मेधा कुलकर्णी यांनी विरोधाचे विधान केले, असा आरोप करत त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी अलका चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दुचाकीवर “स्टंट’ करत निषेध नोंदविला.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मागील आठवड्यापासून खासदार आणि आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्याचदरम्यान आमदार मेधा कुलकर्णी यांनी हे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याचे विधान केले होते, असा आंदोलकांचा आरोप आहे. त्यांच्या या विधानाच्या निषेधार्थ अलका चौकात दुचाकीवर धाडसी प्रात्यक्षिके दाखवत निषेध नोंदवला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)