आ.कर्डिलेंनी फोडली केडगावची कॉंग्रेस ; उलथापालथीची नगर शहरात उलटसुलट चर्चा

नगर: महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केडगावमध्ये राजकीय भूकंपच झाला. सोमवारी रात्री आलेल्या आदेशानंतर कॉंग्रेसच्या पाच उमेदवारांनी पक्षाची उमेदवारी नाकारून थेट भाजपची उमेदवारी स्वीकारली.आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी भाजपने निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवले असले तरी त्यांनी पक्षाचा महापौर करण्यासाठी आपली मोहिम चालू ठेवली होती. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगावमध्ये सुरूंग लावून कॉंग्रेसमध्ये फोडाफोडी केली. कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर या समर्थकांनी आज भाजपमध्ये प्रवेश करून केडगावमधील कॉंग्रेस संपुष्ठात आली आहे.

दरम्यान, केडगावमधील राजकीय भूकंपाबाबत शहरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपच्या कोअर कमिटीत आ. कर्डिलेंना डावल्यात आले होते. अर्थात त्यांना या निवडणुकीत प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर झाला असला तरी वरिष्ठपातळीवर आ. कर्डिले यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी देण्यात आल्याची बोलले जात आहे. पक्षाचा महापौर झाला पाहिले असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आ. कर्डिले प्रयत्नशिल होते. त्यातून आज केडगावची खेळी झाल्याचे बोलले जात असले तरी शहरात कोतकर, कर्डिले आणि जगताप या व्याह्यांच्यातील राजकारण सर्वांना सर्वश्रृत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरू होती. अर्थात कॉंग्रेसमध्ये निवडणुकीची जबाबदारी युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यावर टाकण्यात आली होती. सुरूवातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे व आमदार बाळासाहेब थोरात यांना लक्ष घालण्याची सुचना केली होती. परंतू त्यानंतर समन्वयक म्हणून तांबे यांनी निवड करून त्यांना अधिकार दिले होते. परंतू दरम्यानच्या काळात या निवडणुकीची जबाबदारी अचानक डॉ. सुजय विखे यांच्यावर टाकण्यात आली.

-Ads-

अर्थात आघाडीचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाची चर्चा तांबे यांच्याबरोबर न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. त्यामुळे आपोआप तांबे या प्रक्रियेपासून बाजू करण्यात आले. आणि डॉ. सुजय विखे प्रक्रियेत आले. आघाडीतील जागा वाटपाची चर्चा डॉ. विखे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यात झाली. तीन ते चार दिवस हे चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते. या चर्चेतून तांबे यांना बाजूला ठेवण्यात आले. अर्थात डॉ. विखे यांनी चर्चेदरम्यान आपण तांबे यांच्या संपर्कात होत असे स्पष्ट केले आहे. त्यात विखे आणि आ.कर्डिले यांचे सख्य देखील जिल्ह्याला माहिती आहे. अशा सर्व परिस्थितीमध्ये केडगावकरांनी घेतलेला भाजपवासीचा निर्णय शहरासह जिल्ह्याच्या दृष्टीने आर्श्‍चयाचा धक्‍का देणार आहे. रविवारी सायंकाळी आघाडीतील जागा वाटप डॉ. विखे व आ. जगताप जाहीर करतात. त्यावेळी कोतकर समर्थक उपस्थित होते. असे असतांना कोतकर सोमवारी रात्री आदेश देवून आपल्या समर्थकांना भाजपची उमेदवारी करण्याचे सांगतात.या सर्व घडामोडी मागे आ. कर्डिले आहे. त्यांनी भाजपचा महापौर करण्यासाठी ही किमया घडवून आली असल्याचे बोलले जात आहे.

कोतकर गटाला 5 जागा

केडगाव उपनगरातील 16 व 17 या दोन प्रभागातील आठ जागापैकी पाच जागा कोतकर गटाला देण्यात आल्या असून उर्वरित तीनपैकी एक ऍड. आगरकर तर दोन खा. गांधी गटाला देण्यात आल्या आहेत. त्यात कोतकर गटाच्या सुनील कोतकर, मनोज कोतकर,लता शेळके, गणेश सातपुते, सुनीता कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात प्रभाग क्रमांक 16 मधून सुनील कोतकर, सातपुते व कांबळे यांना तर प्रभाग 17 मधून मनोज कोतकर व लता शेळके यांना उमेदवार देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup: Thumbs up
5 :heart: Love
2 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
6 :cry: Sad
6 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)