आमदार अनिल गोटे महापौरपदाच्या रिंगणात 

धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर

धुळे – धुळ्यातील भाजपचे आमदार अनिल गोटे हे थेट महापौरपदाच्या रिंगणात उतरले असून ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याबाबत देखील त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. त्यामुळे धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर सभेत धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याबाबत धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: गोटे यांनी याबाबतची घोषणा केली. आपल्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनिल गोटेंनी स्वतःला धुळे महापौरपदाच्या रिंगणात उतरवले आहे. मात्र आमदारपदाचा राजीनामा देऊन महापौरपदाची निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले.

दरम्यान, शिवतीर्थ चौकातील आमदार अनिल गोटे यांच्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तसेच रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या तिघांच्या फोटोला स्थान नव्हते. या सभेत आमदार अनिल गोटे यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाबाबत परखड मत मांडत भाजपला घरचा आहेर दिला.
तसेच भाषण सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्याने दहा मिनिटे सभा थांबण्यात आली होती. दरम्यान निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढत चालली असून याआधी आशिष देशमुख यांनी देखील आमदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)