‘MJ-5’ डान्स ग्रुपच्या पाच वर्ष पूर्तीनिमित्त खास व्हिडीओ शेअर 

स्टार प्लस वाहिनीच्या इंडियाज डान्सिंग सुपरस्टारचे विजेते ‘एमजे-५’ (MJ-5) डान्स ग्रुपला नुकतेच पाच वर्ष पूर्ण झाली. या पाच वर्षाच्या प्रवासात त्यांचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. या संपूर्ण पाच वर्षाच्या प्रवासाला MJ-5 ने एका व्हिडीओत रूपांतरित करून सोशल मीडियावर शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

कार्तिक, श्रेयस खन्ना, रोहित सिंग, हिमांशू गोला आणि विष्णू शर्मा असा हा पाच जणांचा MJ-5 चा ग्रुप. कार्तिक आणि श्रेयस खन्ना यांनी ही टीम बनवली व बाकीचे त्यांचे विद्यार्थी होते. किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या ग्रुपचे नाव MJ-5 ठेवले. २०१३ साली स्टार प्लस वाहिनीच्या इंडियाज डान्सिंग सुपरस्टारच्या पहिल्या सिझनच्या ऑडिशनमध्ये  MJ-5 ग्रुपने डान्स केला आणि जजसहित सर्वच प्रेक्षक त्यांच्या डान्सचे फॅन झाले. या रिऍलिटी शोमध्ये जसेजसे त्यांचे परफॉर्मन्स झाले तशीतशी त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

मायकल जॅक्सनच्या प्रसिद्ध स्टेपवर त्यांनी वेगवेगळ्या तब्ब्ल १६ प्रकारचे मुनवॉल्क सादर केले. या १६ प्रकारच्या मुनवॉल्कने MJ-५ च्या नावाने अनेक वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित झाले. इंडियाज डान्सिंग सुपरस्टारचे  MJ-५ पहिले विजेते बनले. यानंतरही त्यांनी अनेक देश-विदेशातील डान्सिंग शोमध्ये आपला परफॉर्मन्स सादर केला व अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले. त्यांच्या डान्सचे प्रेक्षकांसह बॉलिवूड इंडस्ट्रीही फॅन झाली आहे. त्यांनी आततापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात व अल्बममध्ये डान्स केला आहे. आता त्यांचे पुढचे लक्ष्य डान्स अकॅडमी ओपन करण्याचे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)