मिथीला पालकर…वेबक्वीन ते बॉलीवूड अभिनेत्री

ही चाल तुरुतुरु
उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यांवर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात
केवड्याच्या बनात
नागीण सळसळली…

जयवंत कुलकर्णी यांनी गायलेले हे गीत पुन्हा एक चर्चेत आलं होतं ते नवोदित अभिनेत्री मिथिला पालकरमुळे. तिने गायलेले कफ सॉंग आजही युवकांच्या तोंडून ऐकायला मिळते. मिथिला पालकरची खरी ओळख युट्यूब वेबसिरीज “गर्ल इन द सिटी’ आणि “लिटल थिंग्ज’मध्ये झाली. 2013 मध्ये वांद्रे इथल्या एमएमके कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर मिथिलाने आपल्या करियरला सुरवात केली. “कट्टी बट्टी’ नंतर तिने अनेक छोट्या मोठ्या जाहिराती केल्या. त्यानंतर 2017 मध्ये मिथिलाने मराठी चित्रपट “मुरंबा’तून एन्ट्री केली. आणि आता थेट “कारवॉं’ मधून तिने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली. “कारवॉं मधल्या तिच्या अभिनयाचं सध्या कौतुक केलं जातंय.

-Ads-

मिथिलाने अनेक नाटक व वेबसिरीज केल्या. पण तिचा “कप सॉंग’ ते “कारवॉं’ चित्रपटापर्यंतचा प्रवास प्रशंनसीय आहे. मिथिलाचे “कफ सॉंग’ सोशल मीडियात तुफान पसरले. तिच्या व्हिडियोला युट्युबवर कोटींच्या घरात हिट्‌स आहेत. तिच्या रुपाने कलासृष्टीला नवीन कलाकार मिळाली. तिचे देखणे रूप अनेकांना मोहात टाकल्याशिवाय राहत नाही. तिच्या चाहत्यांची पापणी लागत नाही तोवर मिथिला तुरुतुरु चालत भुरुकन उडून गेली. आज तिला मोठं व्यासपीठ मिळालंय. ते म्हणजे प्रसिद्ध अभिनेते इरफान खान सोबत तिने “कारवॉं’ चित्रपटात काम केले.

“गर्ल इन द सिटी’ आणि “लिटील थिंग्स’ या मराठी वेबसिरीज मध्ये मिथिलाने सुंदर अभिनय केला. स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आलेली मीरा (मिथिला) आपल्या बिनधास्त अभिनयातून समोर आली आहे. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारे अनेक जण स्वतःला मीरासोबत जुळवून घेऊ शकतात. प्रत्येक नाण्यांच्या दोन बाजू असतात. त्यामुळे सकारात्मक दृष्टया विचार केला तर आपले स्वप्न बंदीस्त करून जगणाऱ्यांसाठी मीरा एक उत्तम उदाहरण आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून मिथिलाने मुंबईच्या गर्दीतून यशस्वी पल्ला गाठला. अनेक स्वप्न असलेल्या मिथिलाला आव्हाने पेलायला आवडते. नृत्य, संगीत, गायन आणि अभिनय आशा सर्व क्षेत्रात ती काम करते.

वेब क्वीन मिथिला वेबसिरीजच्या यशानंतर मराठी अभिनेता अमेय वाघ सोबत “मुरंबा’ चित्रपटात झळकली होती. तसेच तिचे नाव प्रतिष्ठेच्या “फोर्ब्स इंडिया’ मासिकाने प्रसिद्ध केलेल्या आशिया खंडाच्या यादीत झळकले होते. 2014 मध्ये मिथिलाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. “माझं हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे तिने करिअरला सुरुवात केली. 16 व्या मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली. त्यानंतर “कट्टी बट्टी’ हा चित्रपट तिने केला. त्यानंतर मिथिला थेट पोहचली ते बॉलीवूड पर्यंत!

अभिनेता इरफान खान, दलकेर सलमान आणि वेबक्वीन मिथीला पालकरची प्रमुख भूमिका असलेला “कारवॉं’ म्हणजे आपल्या धकाधकीच्या, गुंतागुंतीच्या आयुष्यात अलगत येणारी एक सुखाची झुळूक आहे.

मिथिला पालकर हे नाव सिनेरसिकांसाठी आता नवीन नाही. वेबसीरिजचं जग गाजवणारी मिथिला आताच्या तरुणाईसाठी फॅशन आयकॉन म्हणून पुढं आली आहे. सोशल मीडियावरही मिथिलाची जादू पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. वेब सीरिज, छोटे व्हिडीओज, कप सॉंग या निमित्ताने मिथिला लोकप्रिय झाली. तिच्या या लोकप्रियतेमागचं कारण म्हणजे तिचा हटके अंदाज हेच आहे. तिच्या रुपाने आणखीन्‌ एक मराठी अभिनेत्री बॉलीवूड मध्ये आपलं नशीब आजमावत आहे.

– संदीप कापडे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)