मिस्त्री कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील निवडणूक निरीक्षक 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरूवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही महत्वाच्या नियुक्‍त्या केल्या. त्यानुसार, ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्यावर पक्षाच्या महाराष्ट्रातील निवडणूक निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. खासदार रणजीब बिस्वाल यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय, शैलेंद्र आणि रचित सेठ यांना पक्षाचे राष्ट्रीय माध्यम समन्वयक बनवण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेल्या मिलिंद देवरा यांनी गुरूवारी सुत्रे स्वीकारली. संजय निरूपम यांना हटवून 42 वर्षीय देवरा यांना मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्यात आले. ते राहुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. देवरा आणि निरूपम या दोघांनाही कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतूून उमेदवारी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)