‘मिशन शक्ती’ : राज ठाकरेंकडून वैज्ञानिकांच अभिनंदन; तर नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

मुंबई – भारताने A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ आॅर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युध्द सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुध्दा आपल्याअधिकृत ट्विटर खात्यावरून भारतीय वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ”एक अंतर्गत चाचणी म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. याबद्दल वैज्ञानिकांचे नक्कीच अभिनंदन आणि खरंच त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाआहे.

तसेच ” वैज्ञानिकांच कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या, त्यांना प्रसिध्दी मिळू द्या” असा टोलादेखील राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांनी देखील पंतप्रधान मोदींवर ‘मिशन शक्ती’वरून खोचक टीका केली आहे. डीआरडीओ आणि इस्रोनं उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (27 मार्च) दिली. याचबदल ही बातमी सांगण्यापूर्वी काही तासापूर्वी पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचा संदेश देणार असल्याचं ट्वीट केलं होतं.

#MissionShaktiची घोषणा करायला मोदी काय अंतराळात चाललेत का? : ममता बॅनर्जी

#MissionShakti यात तुमचे योगदान काय? धनंजय मुंडेंचा पंतप्रधान मोदींना सवाल

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here