#MissionShakti वरून ‘राष्ट्रवादी-भाजपम’ध्ये ट्विटरवार

पुणे-A-SAT क्षेपणास्त्राच्या मदतीने लो अर्थ आॅर्बिटमध्ये (LEO) एका लाईव्ह सॅटेलाईटचा अवघ्या तीन मिनिटात वेध घेतला. त्यामुळे अंतराळातही युध्द सज्जता असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन केलं जात आहे.

तर दुसरीकडे यावरून देशात राजकारण चांगलेच तापले आहे. सोशल माध्यमांवरून राष्ट्रवादी-भाजप कडून यावरून एकमेकांवर टीकास्त्र सुरू झाले आहे.

राष्ट्रवादीने मिशनशक्तीवरून नरेंद्र मोदी यांच्यावर व्यंगचित्राव्दारे निशाना साधत ट्विट केले आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या कामगिरीच्या श्रेयाचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूकीसाठी करत असल्याची टीका करताना राष्ट्रवादीने म्हटले आहे की,

“ज्यांनी घडविला इतिहास
ते राहिले दूर!
अन् मोदींचे कॅमेऱ्यासमोर
देशभक्तीचे सूर…”

त्यानंतर लगेगच या टीकेला भाजपकडूनही राष्ट्रवादीला त्यांच्याच स्टाईलने प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपने म्हटले आहे की,

देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही पाऊल
उचलणार नाही
आणि
दुसऱ्यांना सुद्धा उचलू देणार नाही!
‘गिरे तो भी टाँग ऊपर’ म्हणजेच राष्ट्रवादी

https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1110897710750527489

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)