मिरवैझ फारूख घरातच स्थानबद्ध

श्रीनगर: जम्मू काश्‍मीरातील हुर्रियत परिषदेचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारूख यांना आज त्यांच्या घरातच स्थानबद्ध करण्यात आले आहे. दक्षतेचा उपाय म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे असे पोलिसांनी सांगितले. या प्रकराच्या विरोधात जोरदार आवाज उठवताना फारूख यांनी म्हटले आहे की आमच्या संघटनेच्या नेत्यांना राज्यात कोणत्याही प्रकारच्या राजकीय हालचालीच करण्यास मज्जाव केला जात आहे.

त्यांनी आपल्या घराच्या बाहेर नेमण्यात आलेल्या पोलिस फौज फाट्याचा फोटोच ट्‌विटर अकोैंटवर टाकला आहे.त्यांनी आपल्या संघटनेचा मेळावा आयोजित केला होता त्याला पोलिसांचा विरोध आहे. श्रीनगरातील शांतता बिघडू नये म्हणून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. हुर्रियत परिषद ही विविध फुटीरवादी संघटनांची एकछत्री संघटना आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)