अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती : पालकांची उत्पन्न मर्यादा वाढविली 

मुंबई  – उच्च व्यावसायिक तसेच इयत्ता बारावीनंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणा-या राज्यातील गुणवत्ताधारक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लाखांवरून 8 लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयही जारी झाला आहे.

उच्च व्यावसायिक व इयत्ता 12 वी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणा-या अल्पसंख्यांक विद्याथ्यांकरिता राज्य शासनातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.आधी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित अल्पसंख्यांक विद्य्‌ाथ्याच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख रूपये होती.ती नंतर वाढवून 6 लाख रूपये करण्यात आली होती.त्यातही वाढ करून 6 लाखांवरून ती 8 लाख रूपयांपर्यंत नेण्याचा विचार सरकारकडून सुरू होता. अल्पसंख्यांक विकास विभागाने हा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)